मुंबईत शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

मुंबईत शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

ही शस्र त्यांनी उत्तर प्रदेशातल्या मेरठवरुन आणल्याची माहिती आरोपींनी दिलीये.

  • Share this:

मुंबई, 02 मे : मुंबईत बेकायदेशिरपणे हत्यारं विकणाऱ्या दोघांना एलटी मार्ग पोलिसांनी अटक केलीये. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय.

गुप्तहेरांकडून दोन व्यक्ती मुंबईत शस्र विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मरिन लाईन्स भागात सापळा रचून दोन संशयीतांना ताब्यात घेतलं.  त्यांच्याजवळ दोन मॅगझिन आणि दहा काडतुसांसह दोन परदेशी बवावटीची पिस्तुलं, एक भारतीय बनावटीचं पिस्तुल, त्याची दोन मॅगझिन्स आणि दहा जिवंत काडतुसं, तसंच एक भारतीय बनावटीचा कट्टा आणि त्यासाठीची दोन जिवंत काडतुसं आणि तीन मोबाईल हस्तगत केले.

या दोघांकडेही शस्र बाळगण्याचा परवाना नव्हता. त्यानुसार, भारतीय हत्यार कायद्यान्वये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही शस्र त्यांनी उत्तर प्रदेशातल्या मेरठवरुन आणल्याची माहिती आरोपींनी दिलीये. दोन्ही आरोपींना 5 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2018 08:20 PM IST

ताज्या बातम्या