Home /News /mumbai /

Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

दोन्ही आरोपींनी कोर्टात 'सारे जहाँ से' अच्छा हे देशभक्ती गीत म्हटलं. आम्ही काहीही केलेलं नाही. आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो. सारे जहाँ से अच्छा हिन्दोसताँ हमारा, असं ते म्हणाले.

मुंबई, 13 मे : टेरर फंडींग प्रकरणात एनआयएने (NIA) अटक केलेले आरोपी आरीफ शेख आणि शब्बीर शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने 20 मे पर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. एनआयएने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्याशी संबंधीत छापेमारी दरम्यान दोन्ही आरोपींना आज सकाळी मुंबईतून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. या दोन्ही आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी NIAची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी खळबळजनक खुलासे केले. मुंबई सत्र न्यायालयात NIAचे वकील संदिप सदावर्ते यांनी युक्तीवाद केला. "दोन्ही आरोपी हे डी कंपनीशी संबंधित आहेत. डी कंपनीचे तार अनेक दहशतवादी संघटनाशी जोडलेले आहेत. देशात घातपात घडवून आण्याचा मोठा कट होता. पकडलेले आरोपी डी कंपनीचे हस्तक असून मनी लान्ड्रिंग सारख्या गुन्ह्यात गुंतलेले आहेत. आरोपींचे काही संशयास्पद आर्थिक व्यवहाराचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. एनआयएने केलेल्या कारवाईत आरोपींकडून 5 लाखांची रोकड जप्त केली आहे. दोन्ही आरोपी डी कंपणीसाठी हवाला ॲापरेट करायचे. मुंबई पश्चिम उपनगरात डी कंपणीचे सर्व व्यवहार दोघे आरोपी पहायचे", असा दावा वकिलांनी केला आहे. "दोन्ही आरोपी हे छोटा शकीलच्या संपर्कात आहेत. छोटा शकील पाकिस्तानातून जे क्रिमिनल सिंडिकेट चालवतो त्या सिंडिकेटमध्ये दोन्ही आरोपी महत्वाची भूमिका बजावतात. तसेच खंडणी, अंमली पदार्थ तस्करी, दहशतवादी कृत्य यांत या दोन्ही आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे आढळले आहेत", अशी भूमिका NIA वकिलांनी मांडली. "हे दोन्ही आरोपी दाऊद आणि छोटा शकलीच्या संपर्कात होते असे NIAकडे पुरावे आहेत. त्यामुळे या दोघांच्या मार्फत दाऊद आणि छोटा शकीलचे लोकेशन काढायचे आहे", असादेखील युक्तीवाद NIAच्या वकीलांनी कोर्टात केला. (महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....) यावेळी दोन्ही आरोपींनी कोर्टात 'सारे जहाँ से' अच्छा हे देशभक्ती गीत म्हटलं. आम्ही काहीही केलेलं नाही. आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो. सारे जहाँ से अच्छा हिन्दोसताँ हमारा, असं ते म्हणाले. यावेळी न्यायमूर्तींनी आरोपींना कुटुंबीयांना सांगितलं आहे का? सरकारी वकिल हवा आहे का? असे प्रश्न विचारले. दोन्ही आरोपींनी सरकारी वकिलाची मागणी केली. सुनावणीअंती न्यायालयाने दोन्ही आरोपींना 20 मे पर्यंत NIA कोठडी सुनावली दरम्यान, "दोन्ही आरोपींना छोटा शकील याच्याकडून पैसे येत होते. त्या पैशांमधून आरोपी मुंबईत टेरर फंडींग करत होते. तसेच त्या पैशांतून ते बऱ्याच ठिकाणी टेरर फंडींग करत होते, असे त्यांचे आरोप आहेत. अनेक राजकीय नेते त्यांच्या टार्गेटवर होते. त्यांच्याकडे राजकीय नेत्यांची लिस्ट आहे. याशिवाय अनेक राजकीय नेते यांच्या संपर्कात होते. याबाबत चौकशी करण्यासाठी NIAला त्यांची कोठडी हवी आहे", अशी प्रतिक्रिया आरोपींची वकील अपेक्षा वोरा यांनी दिली.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या