हेही वाचा..पिंपरी चिंचवड हादरलं, 13 वर्षांच्या मुलीचा तीन नराधमांनी केला विनयभंग काय आहे प्रकरण? रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि माजी मुख्यमंत्री तसंच सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. 'आपल्या पक्षाच्या या विकृती आपल्याला सगळ्यांना भाजपचे संस्कार दाखवतात. की, येथेही आपण आरोपीला क्लिनचीट देणार आहात?' असा सवाल करत त्यांनी फडणवीसांवर टीका केली होती. तसेच चित्रा वाघ यांनाही याप्रकरणांत सामिल करून घेत आपण या प्रकरणी एवढ्या शांत का? असा प्रश्नही केला होता. 'चित्रा वाघ तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का?' असं चाकणकरांनी चित्रा वाघ यांना आपल्या ट्वीटमधून विचारलं होतं. हेही वाचा..मोदी-शहांवर हल्लाबोल करत शरद पवारांनी मुंबईत भाजपवर केला गंभीर आरोप नंतर रुपाली चाकणकर यांच्या या सवालानंतर चित्रा वाघ यांनीही घणाघाती प्रत्युत्तर दिलं होतं. ज्याने गुन्हा केला असेल त्याला त्याची शिक्षा मिळेलच. नेत्यांच्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन मी या अगोदरही केलं नाही आणि आताही करत नाही. आणि इथून पुढच्या काळातही मी चुकीच्याचे समर्थन कधीचं करणार नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत,आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा,आजही पळता भुई कमी होईल....हिशोबात.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 29, 2020
.
.
झाकली मूठ सव्वा लाखाची..#दलबदलू @ChitraKWagh @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Latest news, Twitter War