'तिथं पण कोण उभं करणार नाही'. ठाकरेंवरील टीकेनंतर अमृता फडणवीसांवर शिवसेनेचा पलटवार

'तिथं पण कोण उभं करणार नाही'. ठाकरेंवरील टीकेनंतर अमृता फडणवीसांवर शिवसेनेचा पलटवार

देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्यावरून राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधलाय.

  • Share this:

मुंबई, 23 डिसेंबर: अमृता फडणवीस यांनी रविवारी ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी खुमासदार शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस ट्विटरवर खूप सक्रीय झाल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी आता थेट शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटला शिवसेनेच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी रिट्वीट करत चोख उत्तर दिलं आहे. ''माजी' झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉलला उभं पण करणार नाही. त्यामुळे बाकी बिग बॉससाठी चालू देत जोरदार' अशी जहरी टीका अमृता फडणवीस यांच्यावर केली आहे.

य़ा ट्विटला रिट्वीट करून वरूण सरदेसाई आणि शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!' अशा शब्दा शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी अमृता फडणवीस यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्यावरून राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधलाय. या आधीही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. 'माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही' असं राहूल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

त्यानंतर आठ दिवसांनी अमृता फडणवीस यांनी ट्विटरूवरून प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, 'खरंय देवेंद्रजी, फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं' अशी थेट टीकाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2019 11:50 AM IST

ताज्या बातम्या