#Happy2019 : पहिल्याच दिवशी जुळ्यांची कमाल, एका बाळाचा जन्म लोकलमध्ये तर दुसऱ्याचा प्लॅटफॉर्मवर

#Happy2019 : पहिल्याच दिवशी जुळ्यांची कमाल, एका बाळाचा जन्म लोकलमध्ये तर दुसऱ्याचा प्लॅटफॉर्मवर

पालघरच्या सफाळे देऊळपाडा इथं रहिवासी छाया सवरा या 20 वर्षीय महिलेने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विरार-डहाणू लोकलमध्ये एका बाळाला जन्म दिला. तर...

  • Share this:

विजय राऊत, प्रतिनिधी

पालघर, 01 जानेवारी : पालघरच्या सफाळे देऊळपाडा इथं रहिवासी छाया सवरा या 20 वर्षीय महिलेने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विरार-डहाणू लोकलमध्ये एका बाळाला जन्म दिला. तर पालघर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील प्रतीक्षालयात त्यांच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला.

आश्चर्याची बाब म्हणजे पालघर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर चक्क रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयात त्यांनी ही प्रसूती केली. पालघरमध्ये घडलेली बहुदा ही पहिलीच घटना असावी. दोन्ही बाळं आणि आईची प्रकृती आता चांगली असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली आहे.

छाया यांना सकाळच्या सुमारास प्रसूतीच्या वेदना जाणवल्याने तिच्या पतीने तिला सफाळे इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र प्रसूतीमध्ये अडचणी येणार असल्याने तिला पालघर इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितलं.

वेळ कमी असल्यामुळे छाया यांचा पती अंकुश आणि सासू कमली यांनी तिला रेल्वेने नेण्याचा निर्णय केला. सकाळीच नऊच्या सुमारास विरार-डहाणू लोकलमध्ये छाया हिला बसवून पालघर येथे नेत असताना पालघर स्थानकाजवळ छाया यांच्या प्रसूतीच्या कळा वाढल्या. त्यात त्यांनी लोकलमध्येच एका बाळाला जन्म दिला.

या घटनेची माहिती पालघर रेल्वे स्थानकाच्या कार्यालयास देण्यात आली. त्यानुसार स्टेशन मास्तरांपासून ते लोहमार्ग पोलीस, स्थानक सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण कामाला लागले. रेल्वे स्थाकावर पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं.

दुसरीकडे सफाई कर्मचारी यांनी प्रसूतीची गरज लक्षात घेता संपूर्ण प्रतिक्षालाय स्वच्छ केलं तर पोलिसांनी यात आपली चोख भूमिका बजावली. रेल्वे प्रवशांची मदतही यावेळी महत्वाची ठरली.

यावेळी लोकल पालघर स्थाकात सुमारे 20 मिनिटं थांबवून ठेवण्यात आली. छाया यांना त्यानंतर प्रतीक्षलयात पुढील प्रसूतीसाठी नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांच्या प्रयत्नातून या मातेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. या प्रसूतीनंतर बाळ आणि आई सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास घेतला.

आई आणि बाळांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलं असून पुढील उपचार सुरू आहेत.

VIDEO: 'हेल्मेट घालून जिवंत राहणार असं कुठे लिहलंय', पुणेकरांच्या भन्नाट प्रतिक्रिया

First published: January 1, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading