Home /News /mumbai /

मुंबईच्या Wockhardt मध्ये 26 नर्स आणि 3 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण रुग्णालय केलं क्वारंटाइन

मुंबईच्या Wockhardt मध्ये 26 नर्स आणि 3 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण रुग्णालय केलं क्वारंटाइन

भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.

भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील असून मृत्यूंची संख्याही मुंबईत जास्त आहे. यातच वैद्यकीय उपचार देणाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे

  मुंबई, 6 एप्रिल : देशभरात कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील (Mumbai) Wockhardt रुग्णालयातील 26 नर्स आणि तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण रुग्णालय क्वारंटाइन घोषित करण्यात आलं आहे. मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं आकडेवारीवरुन समोर येत आहे. त्यामुळे मुंबई अनेक भागांमध्ये लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले आहे. त्यातच कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आल्याने भीती वाढली आहे. संबंधित - राज ठाकरेंचा तबलिगींना इशारा, मुस्लीम मंडळाने व्यक्त केली भीती,म्हणाले... देशात कोरोना बळींची संख्या 109 पर्यंत पोहोचली आहे. तर एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4067 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आकड्यांनुसार देशात आतापर्यंत 291 रुगांवर उपचार झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे. संपूर्ण कोरोनाग्रस्तांमध्ये 65 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. मंत्रालयाने सकाळी 9 वाजता दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 690 पोहचली असून त्यानंतर तामिळनाडून 571, दिल्ली 503, तेलंगणा 321, केरळ 314 आणि राजस्थान 253 रुग्णांची संख्या आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर काल देशभरातील नागरिकांनी घराबाहेर दिवे पेटवून देशात कोरोनामुळे पसरलेला अंधार दूर करण्याची प्रार्थना केली. एकजूटीने लढू आणि देश कोरोनामुक्त असू असं वचन यावेळी नागरिकांनी एकमेकांना दिलं. संबंधित - कोरोना राहिला बाजूला, भावानेच घेतला बहिणीचा जीव; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Corona virus in india

  पुढील बातम्या