मुंबई, 29 मार्च: अवघ्या 21 वर्षांच्या आयआयटी परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या तरुणाला गुगलकडून 1.2 कोटींचं पॅकेज मिळालं आहे. अब्दुल्ला खान असं या तरुणाचं नाव आहे. अब्दुल्ला खान सप्टेंबरमध्ये लंडमधील ऑफिसमध्ये कामावर रूजू होणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रोग्रामिंग साईटवर प्रोफाईल पाहून त्याला गुगलंनं मुलाखतीसाठी बोलवून घेतलं. ऑनलाईन मुलाखतींचे टप्पे हुशारीनं पार केले. अंतिम मुलाखतीत अब्दुल्ला उत्तीर्ण झाला आहे. त्याला आता गुगलकडून वर्षाला 1.2 कोटींचं वेतन मिळणार आहे.
अब्दुल्लाचं आयाआयटीत जाण्याचं स्वप्न होतं. मात्र आयआयटीच्या परीक्षेत तो अनुतीर्ण झाला. त्यानं मीरा रोड येथील श्री. एल. तीवारी इंजिनीअरिंग कॉलेजमधून त्यानं कंप्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं. नोव्हेंबर 2018 रोजी गुगलकडून त्याला एक मेल आला आणि एका मेलनं अब्दुल्लाचं नशीब पालटलं. अब्दुल्ला आपला अनुभव सांगताना म्हणतो, ‘मी एका स्पर्धेत सहभागी झालो होतो. गुगलसारख्या कंपन्या अशा स्पर्धेत उतरणाऱ्या प्रोग्रॅमरच्या प्रोफाईलवर लक्ष ठेऊन असतात. त्यानंतर मला एक दिवस अचानक मुलाखतीसाठी गुगलकडून मेल आला. मी मुलाखत देत गेलो. गुगलकडून अशी ऑफर येईल असे कधीच वाटले नव्हते. मी गुगलसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. त्यांनी दिलेली संधी खूप मोठी आहे. हा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा असणार आहे.’
आयआयटीचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या तरुणाला आयआयटी परीक्षा उत्तीर्ण जरी होता आली नाही तरी आज गुगलसारख्या मोठ्या कंपनीत त्याला एवढी मोठी संधी मिळाली ही आयआयटीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही हेवा वाटण्यासारखी गोष्ट आहे.
उत्तर मुंबई : उर्मिलाच्या राजकीय अंदाजासमोर विरोधकही धास्तावले