मुंबईत फरसाण दुकानात अग्नितांडव ; 12 जणांचा होरपळून मृत्यू

घाटकोपरच्या खैराणी रोड परिसरातील भानू फरसाण या दुकानाला आज पहाटे आग लागली. या आगीचं कारण मात्र अजून कळू शकलेलं नाही. दरम्यान या आगीत जळून जखमी झालेल्यांना तात्काळ राजावाडी रूग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2017 10:35 AM IST

मुंबईत फरसाण दुकानात अग्नितांडव ; 12 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई,18 डिसेंबर: मुंबईमधील घाटकोपरमध्ये भीषण आग लागली असून या आगीत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे एका मिठाईच्या दुकानात आग लागली होती.

घाटकोपरच्या खैराणी रोड परिसरातील  भानू फरसाण या दुकानाला आज पहाटे आग लागली. या आगीचं कारण मात्र  अजून कळू शकलेलं नाही. दरम्यान  या आगीत  जखमी झालेल्यांना तात्काळ राजावाडी रूग्णालयात नेण्यात आलं होतं.  त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान आता आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. तरी आगीमुळे या दुकानाचा प्रचंड नुकसान झालं असून त्याच्या काही भिंती कोसळल्या आहेत.त्यामुळे दुकानात अजूनही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. अग्निशमन दलाचं बचाव कार्य सध्य सुरू आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसात आग लागण्याचं प्रमाण  प्रचंड वाढलंय. काल नवी मुंबईतील एका केमिकल फॅक्ट्रीतही आग लागली होती. त्यामुळे  आता या आगीच्या प्रश्नांबाबत सरकार काय पाऊलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...