News18 Lokmat

सावत्र मुलीला दाखवला मॉडेलचा अश्लील फोटो.. श्वेता तिवारीच्या पतीला अटक

सुपरहिट टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की'- सीजन 1 फेम अभिनेत्री श्वेता तिवारीचा दुसरा पती अभिनव कोहली याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 05:09 PM IST

सावत्र मुलीला दाखवला मॉडेलचा अश्लील फोटो.. श्वेता तिवारीच्या पतीला अटक

मुंबई,12 ऑगस्ट- आपल्या सावत्र मुलीला मोबाइलवर एका मॉडेलचा अश्लील फोटो दाखवला, तसेच तिला शिवीगाळ करत तिच्यासोबत गैरवर्तणूक केल्या प्रकरणी सुपरहिट टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की'- सीजन 1 फेम अभिनेत्री श्वेता तिवारीचा दुसरा पती अभिनव कोहली याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे श्वेता तिवारीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

श्वेता तिवारी हिने पती अभिनव कोहलीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर सावत्र मुलीचा विनयभंग केल्याच्या श्वेता हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिनव कोहलीला अटक केली आहे. अभिनव कायमच दारुच्या नशेत असतो. त्याने 18 वर्षीय सावत्र मुलगी पलकचा शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याचे श्वेताने तक्रारीत म्हटले आहे. श्वेताच्या तक्रारीवरून मुंबईतील समतानगर पोलिसांनी अभिनवला रविवारी (11 ऑगस्ट) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास अटक केली. विशेष म्हणजे पोलिस स्टेशनमध्ये श्वेता-पलकच्या उपस्थितीत अभिनवची चार तास कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी अभिनवविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या पतीकडूनही झाला होता कौटुंबिक हिंसाचार..

श्वेता तिवारी याआधीही कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरली होती. तिचा पहिला पती राजा चौधरी हा देखील दारुच्या नशेत श्वेताला मारहाण करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून श्वेताने राजासोबत 2007 मध्ये घटस्फोट दिला होता. घटस्फोटानंतर मुलगी पलक श्वेतासोबतच राहते.

नंतर अभिनवसोबत जुळले श्वेताचे सूत..

Loading...

अभिनव कोहली हा श्वेता तिवारीचा दुसरा पती आहे. 'जाने क्या बात है' या मालिकेत अभिनव आणि श्वेताने एकत्र दिसले होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी 2013 रोजी लग्न केले आणि त्यांना रेयांश हा मुलगाही आहे. मात्र, अभिनव आणि श्वेतामध्ये मागील एका वर्षापासून खटके उडत आहे.

महापुरात बुडाले होते कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी कार्यालय, आता आहे अशी अवस्था पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2019 05:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...