डिप्रेशनमध्ये होती टीव्ही अ‍ॅक्ट्रेस.. मुलीचा गळा घोटून स्वत:ही केली आत्महत्या

टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अ‍ॅक्ट्रेसने अल्पवयीन मुलीचा गळा घोटून हत्या केली. नंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 09:48 PM IST

डिप्रेशनमध्ये होती टीव्ही अ‍ॅक्ट्रेस.. मुलीचा गळा घोटून स्वत:ही केली आत्महत्या

मुंबई, 10 ऑगस्ट- टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या एका अ‍ॅक्ट्रेसने अल्पवयीन मुलीचा गळा घोटून हत्या केली. नंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीलियलमध्ये काम न मिळाल्याने टीव्ही अ‍ॅक्ट्रेस डिप्रेशनमध्ये होती, नैराश्येतून तिने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

ही हृदय पिळटून टाकणारी ठाण्याच्या कळवा येथील गौरी सुमन सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी घडली. प्रज्ञा पारकर असे या टीव्ही अ‍ॅक्ट्रेसचे तर श्रुती पारकर असे तिच्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी प्रज्ञा पारकरचे पती प्रशांत पारकर यांनी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पती गेला होता जिमला ..

प्रज्ञा पारकर यांचे पती प्रशांत पारकर हे सकाळी जिमला गेले होते. ते घरी परत आल्यावर घरात प्रवेश करताच मुलगी श्रुती बेडवर पडलेली तर गळफास लावलेल्या अवस्ठेत पत्नी प्रज्ञा दिसली. घरातील भयावह चित्र पाहून प्रशांत यांना धक्का बसला. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना दिली. माहिती मिळताच कळवा पोलिस घटनास्थळी पोहोचले.

सुसाइड नोट सापडली..

Loading...

पोलिसांना घरातून सुसाइड नोट सापडली आहे. सीलियलमध्ये काम मिळत नसल्याने प्रचंड डिप्रेशन आले आहे. त्यामुळे मुलगी श्रुतीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करत असल्याचे प्रज्ञा पारकर हिने सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. पोलिस निरीक्षक शेखर बागडे .यांनी सांगितले की, प्रज्ञा पारकर ही मराठी टीव्ही इंडस्ट्रीत काम करत होती. मागील महिन्यांपासून तिच्याकडे एकही काम नव्हते. पतीलाही व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

VIDEO : ...म्हणून गिरीश महाजनांनी सेल्फी व्हिडिओत हात उंचावला, मुख्यमंत्र्यांनी केलं समर्थन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2019 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...