महिला ज्योतिषावर बलात्कार; हा टीव्ही अभिनेता गजाआड

महिला ज्योतिषावर बलात्कार; हा टीव्ही अभिनेता गजाआड

मुंबईत बलात्काराचा व्हिडीओ दाखवत पैसे उकळल्याचा आरोप एका टीव्ही अभिनेत्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात अभिनेत्याला ओशिवरा पोलिसांनी अटक देखील केली आहे.

  • Share this:

मुंबई, 06 मे : महिला ज्योतिषावर बलात्कार आणि खंडणी प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी एका टीव्ही अभिनेत्याला अटक केली आहे. करण सिंह ओबेरॉय असं या टीव्ही अभिनेत्याचं नाव आहे. करण सिंह ओबेरॉय विरोधात लग्नाचं वचन देत बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेनं करण सिंह ओबेरॉयनं बलात्काराचा व्हिडीओ तयार केला. शिवाय, व्हिडीओच्या आधारे मला ब्लॅकमेल करत पैसे उकळले असा आरोप केला. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी ही कारवाई केली. या साऱ्या प्रकरणात पोलिसांनी आता तपास देखील सुरू केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

FIR नुसार ऑक्टोबर 2016मध्ये एका डेटिंग अपद्वारे दोघांची ओळख झाली. काही काळानंतर ओळखीचं रूपांतर मैत्रित झालं. यानंतर करण सिंह ओबेरॉयनं पीडितेला आपल्या घरी बोलावलं. शिवाय, लग्नाचं वचन देखील दिलं. यावेळी करण ओबेरॉयनं पीडितेला नारळ पाणी पाजलं. नारळ पाणी प्यायल्यानंतर पीडितेचा चक्कर आली. हीच वेळ साधत करणनं पीडितेवर बलात्कार केला. तसेच त्याचा व्हिडीओ देखील तयार केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे.

लग्नाची विचारणा केल्यानंतर धमकी

या व्हिडीओच्या माध्यमातून करण सिंह ओबेरॉय पीडितेकडे सतत पैशांची मागणी करू लागला. तसेच लग्नासाठी विचारणा करताच टाळाटाळ करू लागला. सतत पैशांसाठी तगादा लावू लागला. काही दिवसांपूर्वी जेव्हा लग्नासाठी पीडितेनं दबाव टाकला तेव्हा तुला जे करायचं आहे ते कर असं उत्तर करण सिंह ओबेरॉयनं दिलं. त्यानंतर पीडितेनं पोलिस ठाण्यात जात तक्रार दाखल केली. पोलिसांनी करण सिंह ओबेरॉयला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कारासह खंडणी उकळल्याचा आरोप आहे.

VIDEO: नाशिकमध्ये 3 लाखांच्या पैठणी साड्यांवर चोरांचा डल्ला

First published: May 6, 2019, 1:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading