'त्या मुलीनं तुला मारून टाकलं'; TV अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर वडिलांनी फेसबुकवरून केला सनसनाटी आरोप

'त्या मुलीनं तुला मारून टाकलं'; TV अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर वडिलांनी फेसबुकवरून केला सनसनाटी आरोप

राहुल दीक्षित नावाच्या टेलिव्हिजन कलाकाराने गळफास लावून आत्महत्या केली असून त्याच्या वडिलांनी एका मुलीवर सनसनाटी आरोप केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 31 जानेवारी : टेलिव्हिजन अभिनेता राहुल दीक्षितने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहुलने त्याच्या मुंबईतील राहत्या घरी ओशीवारा परीसरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार राहुल हा मूळ जयपूरचा राहणारा होता. अभिनय क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी तो मुंबईत आला होता. पण त्याला अभिनय क्षेत्रात चांगली संधी मिळाली नाही.

चांगलं काम मिळावं म्हणून राहुल गेल्या अनेक वर्षांपासून स्ट्रगल करत होता. 30 जानेवारीला सकाळी गळफास घेऊन त्याने आपलं आयुष्यं संपवलं. 28 वार्षाच्या राहुलने आत्महत्या केल्याची बातमी सगळ्यांसाठीच खळबळजनक आहे. राहुल आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता या प्रकरणाचं कारण काही वेगळं असल्याचा इशारा पोलिसांना मिळाला आहे.

रिपोर्टनुसार राहुलच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्या घरी पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये अनेक जण हजर असून भरपूर आवज आणि आरडा ओरड सुरू होता. पार्टी दरम्यान तिथे अचानक भांडणाचा आवाज एकू येऊ लागला. पण त्यानंतर काय झालं याबाबत शेजाऱ्यांना काही कल्पना नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.

मुंबई पोलिसांनी मृत्यूची तक्रार अपघाती निधन म्हणून दाखल केली असून या प्रकरणाबाबत अधिक तपास करत आहेत. याबाबत आणखी काही माहिती हाती लागण्याची शक्यता आहे अशी पोलीस आशा व्यक्त करत आहे.

राहुलच्या जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राहुलचे वडील महेश दीक्षित यांनी दुख: सोशल मीडियावर व्यक्त करत पोस्टमध्ये रुपाली कश्यप या नावाच्या मुलीवर हत्येचा आरोप केला आहे. महेश दीक्षित यांचं म्हणणं आहे की, 'आमचा मुलगा आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे'

First published: January 31, 2019, 2:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading