'फूल गिरा' आणि अफवा पसरली 'पुल गिरा' ; एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीचं सत्य

'फूल गिरा' आणि अफवा पसरली 'पुल गिरा' ; एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीचं सत्य

फूल' गिरा या वाक्यातील फूल हा शब्द पुल असा ऐकल्यामुळे लोक सैरभैर झाली आणि चेंगराचेंगरी झाली अशी माहिती एक प्रत्यक्षदर्शी शिल्पा विश्वकर्माने आयबीएन लोकमतला दिली आहे.

  • Share this:

मुंबई,05 ऑक्टोबर: मुंबईतल्या एलफिन्स्टन रेल्वे ब्रीज दूर्घटनेचे कारण एक अफवा असल्याची माहिती धक्कादायक घटना समोर येते आहे. 'फूल' गिरा या वाक्यातील फूल हा शब्द पुल असा ऐकल्यामुळे लोक सैरभैर झाली आणि चेंगराचेंगरी झाली अशी माहिती एक प्रत्यक्षदर्शी शिल्पा विश्वकर्माने आयबीएन लोकमतला दिली आहे.

शिल्पाने दिलेलल्या माहितीनुसार ती सकाळी विले पार्लेला जाण्यासाठी परळ स्टेशनवर आली होती. घटना घडली तेव्हा ती पुलावर उपस्थित होती. पुलावर एका फूल विक्रेत्याची फूलं पडली. त्यावर कोणीतरी फूल गिरा असं म्हणालं.पण भरगच्च भरलेल्या एल्फिन्स्टन ब्रिजवरच्या उभे असलेल्या लोकांनी फूल हा शब्द पूल असा ऐकला आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला. लोक सैरभैर झाले. कोणी पुलावरून उड्या मारायला लागले. कोणी इकडे तिकडे पळायला लागले. अनेक जण या गडबडीत पुलावरच पडले. शिल्पाही पुलावर पडली होती. तिच्यावर पाच लोक तर खाली दोन लोक होती. सुदैवाने तिला काही भल्या माणसांनी वाचवल्यामुळे ती वाचल्याचं तिनं सांगितलं आहे.

या दुर्घटनेत तब्बल 23 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर सरकारवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. तर राज ठाकरे या घटनेच्या निषेधार्थ आज चर्चगेट स्थानकावर महामोर्चा काढणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2017 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...