News18 Lokmat

मुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

विक्रोळीच्या पार्क साईट पोलीस स्टेशन परिसरात ट्रकचा हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री ही घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 07:51 AM IST

मुंबई : ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

मनोज कुलकर्णी,प्रतिनिधी

मुंबई, 19 एप्रिल : मुंबईच्या विक्रोळी परिसरात शुक्रवारची मध्यरात्री धक्कादायक ठरली. भरधाव वेगात आलेला ट्रक उलटल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विक्रोळीच्या पार्क साईट पोलीस स्टेशन परिसरात ट्रकचा हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री ही घटना घडली आहे. रस्त्यावरून जात असताना नाल्याचा कोपरा तुटल्याने ट्रक उलटला. यामध्ये रोडवर असलेल्या 4 लोकांच्या अंगावर हा ट्रक पडला.

ट्रकखाली चिरडल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या एकाला तात्काळ उपचारासाठी नजिकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अश्विन हेवारे, विशाल शेलार, अब्दुल हमीद शेख, चंद्रशेखर मुसडे अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावं असून चांद हसन शेख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

Loading...

हेही वाचा : बापरे ! BSPऐवजी BJPला केलं मतदान, पश्चाताप झाल्यानं त्यानं स्वतःचं बोटच कापलं

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रॅक चालकाला ताब्यात घेतलं असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तर पोलीस आता या अपघाताची चौकशी करत आहेत. दरम्यान, रोडच्या मधे असलेला टॅक बाजूला करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून 4 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस आता अपघाताचा तपास करत आहेत.


VIDEO : परत तोंड वर काढलं तर ठेचून काढू; राणेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची डरकाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 07:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...