मुंबई, 30 सप्टेंबर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील (Sanjay Gandhi National Park) आदिवासी पड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. मुंबई शहरात उपलब्ध जमिनीवर हे पुर्नवसन केले जाईल. शासनाच्या जमिनीवर TDR देऊन पुनर्वसन केले जाईल, असे शिवसेना आमदार सुनील प्रभु यांनी आज सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी याबाबत माहिती दिली.
तत्पूर्वी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाडे तसेच पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेऊन त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले जावे, या जागेच्या निश्चितीसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
मराठवाड्यात आलेला महापूर जलयुक्त शिवार योजनेमुळे वाढला आहे का? याबाबत तांत्रिक बाबी तपासून यात काय सत्य हे समोर येईल. तर आनंदराव अडसूळ यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे, विरोधक आरोप करतच राहणार, असेही प्रभु म्हणाले.
हे वाचा - पाऊस कधी थांबणार? मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबद्दल IMD ने दिली माहिती
आरे मधील झोपडपट्टीवासी आणि आदिवासींच्या पुनर्वसनाच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने निविदा दिल्या होत्या. मात्र, बिल्डरना टीडीआर कमी पडत आहे. त्यामुळे पुनर्वसनाचा अडथळा निर्माण झाला आहे. पण, यावर मुख्यमंत्र्यांनी दसऱ्यानंतर तातडीची पुन्हा बैठक लावण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी यावेळी सांगितले.
संजय गांधी पार्क वाढत गेले आणि हे आदिवासी पाडे यामध्ये आले आहेत. या विषयाबाबतच्या आजच्या बैठकीत मुख्यमंत्री सकारत्मक होते. मालाड दुर्घटनेतील 100 लोक अजूनही शाळेत राहत आहेत. त्या 100 लोकांना घरे देण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी आजच्या बैठकीत दिले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai News