मुंबईकरांची काळजी घेत रात्रीच्या अंधारातच शेतकरी मोर्चा विधानभवनाकडे निघाला

संकटमोचक अशी ओळख असणारे भाजप नेते गिरीश महाजनांनी या मोर्चामध्येही मध्यस्थाची भूमिका घेतली आहे

News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2018 07:59 AM IST

मुंबईकरांची काळजी घेत रात्रीच्या अंधारातच शेतकरी मोर्चा विधानभवनाकडे निघाला

ठाणे, 22 नोव्हेंबर : शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या न्यायहक्कासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या वतीनं  ठाणे ते विधानभवनापर्यंत मोर्चा निघाला आहे. मुंबईकरांची आणि खासकरून शाळकरी मुलं, चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होवू नये म्हणून हा मार्चा रात्रीच विधानभवनाकडे निघाला. या मोर्चाला उलगुलान मोर्चा असं नाव देण्यात आले आहे. हजारो कष्टकऱ्यांचा हा मोर्चा थोड्यावेळात आझाद मैदानावर दाखल होईल.


संकटमोचक अशी ओळख असणारे भाजप नेते गिरीश महाजनांनी या मोर्चामध्येही मध्यस्थाची भूमिका घेतली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोर्चेकऱ्यांची भेट घडवून देण्याचं आश्वासन महाजनांनी दिलंय. त्यामुळे मोर्चेकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय.


दरम्यान, आझाद मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ न्यायाधीश बी.जे कोळसे पाटील असतील. यानंतर मुंबई विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे. हजारो शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत भर उन्हातान्हात पायपीट करत आपल्या न्याय हक्कासाठी निघाले. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय.

Loading...


मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली, साताऱ्यासह, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत. कष्टकऱ्यांचं स्थलांतर थांबवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना कराव्यात यासह अनेक मागण्यांसाठी  कष्टकऱ्यांनी सरकारला जाब विचारण्यासाठी एल्गार पुकारला आहे.काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

1.उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा आणि तो मिळण्यासाठी न्यायिक व्यवस्था तयार करण्यात यावी

2. पिढ्यानपिढ्या वनजमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांना वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्वरित त्या जमिनीचे मालक बनवण्यात यावे

3. शहराप्रमाणेच शेतकऱ्यांनासाठी समान भारनियमन असावं

5. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा  करण्यात यावा

6. वनपट्टे धारकांना आणि ज्यांचे वन दावे प्रलंबित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत आणि पिक कर्ज मिळावे

7. पैसा कायद्यामध्ये शेड्युल्ड 5 अंतर्गत येणाऱ्या गावांची पुनर्रचना करून वगळण्यात आलेली गावे समाविष्ट करून घेण्यात यावी

8.दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करवे

9.दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सरसकट दोन रुपये किलोने धान्य मिळावे

10. आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे जिरायत जमिनीला हेक्‍टरी 50हजार आणि बागायत जमिनीला हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे

11.2001 पूर्वी कसत असलेल्या गायरान जमीन धारकांना कायदेशीर पूर्तता करून गायरान जमिनीचे त्यांना मालक बनविण्यात यावे


=====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 07:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...