• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • वीटभट्टी मालकाच्या जोखडातून आदिवासी कुटुंबांची सुटका, केला गंभीर आरोप

वीटभट्टी मालकाच्या जोखडातून आदिवासी कुटुंबांची सुटका, केला गंभीर आरोप

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर ही या देशातील भूमिपुत्र आदिवासी मजुरांची वेठबिगारीची जोखडातून पिळवणूक सुरू असल्याचे विदारक चित्र समजा समोर आले.

  • Share this:
भिवंडी, 11 जानेवारी :  स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर ही या देशातील भूमिपुत्र आदिवासी मजुरांची वेठबिगारीची जोखडातून पिळवणूक सुरू असल्याचे विदारक चित्र समजा समोर आले. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी तालुक्यातील अंजूर या गावातील वीटभट्टी मालकाच्या जोखडातून तीन आदिवासी कुटुंबीयांची सुटका करण्यात यश मिळविले असून नारपोली पोलीस ठाण्यात वीटभट्टी मालकासह त्याचा मुकादम याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या वीटभट्टीवरील राहुल पवार याच्या अपघाती मृत्युबद्दल कुटुंबीयांनी संशय घेत त्याची हत्या वीटभट्टी मालकाने मुकादमाच्या मदतीने केल्याचा आरोप मयत मजुराच्या पत्नीने केला आहे. वाडा तालुक्यातील सिरसाड गावाटेपाडा ता वाडा जिल्हा पालघर येथील आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबीय गुरुनाथ सवरा, राहुल पवार, लहू गायकवाड हे आपल्या पत्नी मुलांसह भिवंडी तालुक्यातील अंजूर या गावातील वीटभट्टी मालक जॉली नाईक याच्या वीटभट्टीवर वेठबिगार म्हणून राबत होते. त्यासाठी जॉली नाईक यांचा मुकादम मधुकर पवार याने या कुटुंबीयांना गणपती, दिवाळी या सणासाठी बायांना म्हणू 15 हजार रुपये आगाऊ देऊन 10 नोव्हेंबरपासून अंजूर येथील वीटभट्टीवर कामासाठी घेऊन गेला असता वीटभट्टी मालक जॉली नाईक याने आपण तुम्हाला भरपूर पैसे बायांना म्हणून दिले असून त्या बदल्यात तुम्ही माझ्याकडे काम करावयाचे असून त्यासाठी आता अधिक पैसे मिळणार नसल्याचे सांगत त्यांना आपल्या वीटभट्टीवर राबवून घेतले. श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोतीराम नामखुडा , गणपत हिलम, हिरामण गुळवी, जयेंद्र गावित यांना या बाबत समजले असता त्यांनी अंजूर इथं जाऊन या वीटभट्टी मजुरांची भेट घेऊन त्यांच्या कडे विचारपूस केली असता त्यांना वेठबिगार म्हणून राबवून घेत मजुरी म्हणून अवघे दोनशे रुपये देत इतर मजुरांना पाचशे रुपये देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर नारपोली पोलीस ठाण्यात याबाबत वीटभट्टी मालक जॉली नाईक आणि मुकादम मधुकर पवार यांच्या विरोधात तक्रार दिली असता पोलिसांनी या दोघांविरोधात भादंवि कलम 323 सह अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम1989 चे 3 [I] [H] , बंध बिगार पद्धती उच्चटन अधिनियम १९७६ चे कलम 16,17,18 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या बाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Published by:sachin Salve
First published: