News18 Lokmat

साप चावला म्हणून आश्रमशाळेची जागा बदलली, आदिवासी विभागाचा अजब दावा

पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांना साप चावल्यामुळे आश्रमशाळेची जागा बदलावी लागली असा विश्वास न बसणारा दावा आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात केलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 4, 2017 09:40 PM IST

साप चावला म्हणून आश्रमशाळेची जागा बदलली, आदिवासी विभागाचा अजब दावा

विवेक कुलकर्णी, मुंबई

04 मे : पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांना साप चावल्यामुळे आश्रमशाळेची जागा बदलावी लागली असा विश्वास न बसणारा दावा आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात केलाय.

इतकंच नाही तर साप चावणं ही नैसर्गिक आपत्ती असल्याचंही त्यांनी सांगत यामुळे आपल्या विभागाला आश्रमशाळा बदलण्याचा निर्णय घ्यावा असं आपल्या विभागाच्या निर्णायाचा बचावही केलाय.

आहे त्या जागी शाळा उभी करणार का यावर राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश देत आत्तापर्यंत आम्हाला भूकंप, पूर, चक्रीवादळं या गोष्टीच नैसर्गिक आपत्ती वाटायच्या असा सणसणीत टोलाही सरकारला लगावला आहे.

2009 साली पालघर जिल्ह्यातील मेढवण गावातील आश्रमशाळा नुतनीकरणाच्या नावाखाली बंद करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात तेथील ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. शाळा दूर गेल्यानं अनेकांनी आपले शिक्षण सोडून दिलाचं याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं.

Loading...

(संग्रहित छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 09:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...