Home /News /mumbai /

टॅक्सीवर झाड पडून दोन जखमी

टॅक्सीवर झाड पडून दोन जखमी

लोअर परळमधील जी. डी. आंबेकर मार्गावर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टॅक्सीवर झाड पडून झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.

24 जुलै : लोअर परळमधील जी. डी. आंबेकर मार्गावर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टॅक्सीवर झाड पडून झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. केईएम रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले असून, मनोहर चंदाणी कोचरेकर आणि विद्यार्थिनी राधेश्याम मिश्रा अशी जखमींची नावे आहेत. रस्त्यावरून टॅक्सी जात असताना अचानक हे झाड पडलं. लागोपाठ झाडं पडून झालेल्या दुर्घटनांमध्ये दोघांनी आपला जीव गमावलाय. त्यामुळे रस्त्यावरच्या झाडांची स्थिती कशी आहे हे पालिकेनं पाहावं, असं नागरिकांचं मत आहे.
First published:

Tags: Taxi, Tree, टॅक्सी

पुढील बातम्या