दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास केलात तर नोकरी जाणार, हा आहे रेल्वेचा नवा नियम

दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास केलात तर नोकरी जाणार, हा आहे रेल्वेचा नवा नियम

रेल्वेतल्या अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या बेकायदेशीर प्रवाशांवर रेल्वे नियम 155 अंतर्गत कारवाई करते.

  • Share this:

स्वाती लोखंडे, मुंबई 2 ऑगस्ट : मध्य रेल्वेच्या मुंबई लोकल मधून तुम्ही दिव्यांग म्हणजेच विकलांगाच्या डब्यातून प्रवास केलात तर आता तुमची नोकरी जाऊ शकते. कारण आता असा प्रवास करताना तुम्हाला रेल्वे पोलिसांनी पकडलं तर थेट तुमच्या कंपनीला याची माहिती रेल्वे देणार आहे. आणि त्यामुळे कदाचित तुमची कंपनी तुमच्यावर कारवाई ही करू शकते.

सिझेरियन करताना महिलेच्या पोटात राहिला कापसाचा गोळा, तीनच दिवसात मृत्यू

नियम धाब्यावर बसवून प्रवास करणाऱ्या लोकांमुळे दिव्यांगाना  मोठ्या दिव्यातून जावं लागतं. आणि म्हणूनच जर तुम्ही आता दिव्यांग नसतानाही, दिव्यांगासाठी आरक्षित डब्यात प्रवास करणार असाल तर  रेल्वे थेट तुमच्या कंपनीला पत्र लिहून तुमच्या निमबाह्य वागण्याविषयी तक्रार करणार आहे. सामाजिक गुन्हा केलेल्या या तुमच्या कर्मचाऱ्यांवर तुम्ही कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. आठवड्याभरात अशा 42 जणांच्या कामाच्या ठिकाणी रेल्वे ने पत्र पाठवलं आहे, ज्यात बँक आणि मोठ्या खाजगी कंपन्यांचा समावेश आहे.

पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, सोडणार नाही!

कोणत्याही कंपनीचे काम करण्याचे काही नियम असतात, जसं एखादा सरकारी कर्मचारी आहे आणि सलग 48 तासांची त्याला जेल झाली असेल तर त्याची सेवा खंडित केली जाते. वचक बसावा यासाठी हा नियम केल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितलंय.

VIDEO : ईडीच्या चौकशीबाबत राज ठाकरेंची पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...

रेल्वेतल्या अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या बेकायदेशीर प्रवाशांवर रेल्वे नियम 155 अंतर्गत कारवाई करते. याच नियमांनुसार रेल्वे पत्र लिहित आहे. पण काही तज्ज्ञांच्या मते या पत्राचा काही फायदा होणार नाही कारण कर्मचारी कायद्याअंतर्गत अशांवर कारवाई करता येणार नाही

गर्दीच्या वेळी रोज जवळपास 50 टक्के दिव्यांग डब्यातील गर्दी ही सामान्य प्रवाशांची असते. अनेकदा कारवाई करूनही सातत्याने नियम मोडणारे काही कमी होत नाही. जानेवारी पासून जुलै पर्यंत 9173 जणांवर कारवाई करण्यात आलीय आणि दंडापोटी 22 लाख 36 हजार रुपये वसूल करण्यात आलेत. तर 766 असे प्रवासी शोधण्यात आलेत ते मध्य रेल्वेच्या विकलांग डब्यातून अनेकदा प्रवास करतात पैकी 2 प्रवाशांना जेल ची हवाही खावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 08:51 PM IST

ताज्या बातम्या