मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'मला लोकांची पर्वा नाही'; 87 वर्षांच्या आजीनं अभिमानानं स्वीकारलं आपल्या ट्रान्सजेंडर नातीला, पाहा VIDEO

'मला लोकांची पर्वा नाही'; 87 वर्षांच्या आजीनं अभिमानानं स्वीकारलं आपल्या ट्रान्सजेंडर नातीला, पाहा VIDEO

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कालीची आजी तिचा ट्रान्सजेंडर महिला म्हणून स्वीकार करू शकते तर इतर लोकही करू शकतात असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कालीची आजी तिचा ट्रान्सजेंडर महिला म्हणून स्वीकार करू शकते तर इतर लोकही करू शकतात असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कालीची आजी तिचा ट्रान्सजेंडर महिला म्हणून स्वीकार करू शकते तर इतर लोकही करू शकतात असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे.

मुंबई, 19 जुलै: आजही आपल्या समाजात ट्रान्सजेंडर(Transgender) लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आजही या लोकांना सर्वसामान्य माणसांप्रमाणे वागणूक दिली जात नाही. त्यांना तुच्छतेची वागणूक दिली जाते. आजच्या विज्ञान युगातही आपल्या देशात अशा लोकांबद्दल अनेक गैरसमज आहेत. आजची तरुण पिढी जितक्या सहजतेनं या लोकांना स्वीकारू शकते तशी जुनी पिढी स्वीकारू शकत नाही. जुनी पिढी तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर, समलैंगिक (LGBT) अशा संकल्पना समजून घेण्यास तयार नसते. त्यांची मानसिकता आजही संकुचित आहे. मात्र एका आजीनं (Grandmother accepts trangender) आपल्या ट्रान्सजेंडर नातीला (Transgender Grand Daughter) स्वीकारत जुन्या पिढीतील बदलाचं उदाहरण समाजासमोर ठेवलं असून, संपूर्ण समाजाच्या डोळ्यातच अंजन घातलं आहे. भारत डॉट रिपब्लिकवर्ल्ड डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या (Humans of Bombay) समुहानं इन्स्टाग्रामवर ही आजी आणि नातीची कहाणी शेअर केली आहे. 87 वर्षांच्या या आजीनं आपल्या जन्मानं मुलगा म्हणून जन्मलेल्या; पण आता शस्त्रक्रिया करून मुलगी झालेल्या काली (Kali) या आपल्या ट्रान्सजेंडर नातीला खंबीर पाठिंबा दिला आहे. ‘मी 87 वर्षांची आहे. लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही. या, मी माझी नात, काली हिची ओळख करुन देते.’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे.

87 वर्षांच्या या आजीला आपल्या नातवाचं असं मुलगी होणं मान्य करणं किती अवघड गेलं असेल, याची कल्पना करणं सहज शक्य आहे. आजही जिथं आपल्या समाजात मुलगा असणं अभिमानाचं मानलं जातं, मुलगा हवा यासाठी मुलीची गर्भातच हत्या केली जाते, मुलीला मुलापेक्षा दुय्यम वागणूक दिली जाते, तिथं परंपरा आणि सामाजिक मान्यतेचं जोखड झुगारून देणं सहज सोपं नसतं. जुन्या पिढीसाठी तर ही गोष्ट फारच अवघड आहे. अशा परिस्थितीत या आजीनं स्वतःच्या दृष्टीकोनात घडवलेला बदल सगळ्या समाजाला नवी दिशा देणारा आहे.

जंगलात फक्त एका रात्रीसाठी गेलं नवं जोडपं; 10 दिवस देत होते जीवनमृत्यूशी झुंज

या व्हिडिओमधूनही आजी आणि नातीचा संघर्ष समोर येतो. यात सुरुवातीला आपली खरी ओळख लपवत मुलासारखे कपडे घालणाऱ्या कालीचे फोटो दिसतात. नंतर ही आजी आपल्या नातीला कालीला अभिमानानं स्वीकारत असल्याचं दिसतं. सुरुवातीला मात्र आजी हा बदल स्वीकारण्यास फारशी उत्सुक नव्हती असंही यात स्पष्ट होतं. आपला नातू नातू नव्हे तर नात झाला आहे, ही बातमी पचवणे कठीण झालेल्या आजीनं अंथरूणच धरलं होतं. तिला भीती वाटत होती समाजाची. समाज काय म्हणेल, लोक त्रास देतील या काळजीनं आजीला त्रास होत होता. त्याचवेळी कालीलाही या सगळ्या गोष्टींचा त्रास होत होता. समाज सोडा पण आपली लाडकी आजी आपल्याला स्वीकारू शकत नसल्यानं कालीलाही मानसिक त्रास होत होता. हे बघून मात्र आजीनं आपल्या नातीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं ठरवलं. तिनं कालीचा खुलेपणानं स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आणि आपले दागिने भेट देत आपण तिला स्वीकारल्याचं दाखवून दिलं. या व्हिडिओमध्ये, हेच दृश्य चित्रित करण्यात आलं आहे. यामध्ये आजी कालीला आपल्या जवळ घेऊन आणि तिला आपले दागिने भेट देताना दिसत आहे. यावर कालीनंही प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ‘माझी आजी ही माझ्यासाठी सर्वात मोठा आणि भक्कम आधार आहे. आजीची अशी इच्छा आहे की आमची कहाणी प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीला त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारण्यासाठी उपयुक्त ठरावी. यामुळे ट्रान्स लोकांना मदत मिळेल, अशी आशा आहे.’ असं तिनं म्हटलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कालीची आजी तिचा ट्रान्सजेंडर महिला म्हणून स्वीकार करू शकते तर इतर लोकही करू शकतात असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे. हा संदेश समाजात सकारात्मकता निर्माण करणारा असून त्याला अतिशय उस्त्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लाईक्स आणि हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री अनुष्का शर्मानंही (Anushka Sharma) यावर हार्ट इमोजी टाकत आपली पसंती व्यक्त केली आहे. आजी आणि ट्रान्सजेंडर नातीची कथा भारतीय समाजाच्या मानसिकतेत बदल घडविणारी आहे, यात शंका नाही.

First published: