राज्यातल्या तब्बल 27 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातल्या तब्बल 27 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

येत्या काही दिवसांत आणखी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जातेय.

  • Share this:

मुंबई, 02 मे : राज्य सरकारने आज तब्बल 27 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एमएमआरडीएच्या आयुक्तपदी आर. ए. राजीव यांची तर सिडको यांच्या व्यवस्थापकीय संचालकपदी लोकेश चंद्रा यांची बदली करण्यात आलीय.

वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदी यू.पी.एस. मदान यांची वर्णी लावण्यात आलीय. तर मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव पदाची धुरा भूषण गगरानी यांना देण्यात आलीय.

2019 च्या निवडणुका जास्त लांब नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देनी महत्त्वाच्या पदावर निकटवर्तीयांची आवर्जून नियुक्ती केल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जातेय.

महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

भूषण गगरानी- सचिव, मुख्यमंत्री कार्यालय

आर. ए. राजीव- आयुक्त - एमएमआरडीए

लोकेश चंद्रा-  सिडको, व्यवस्थापकीय संचालक

यू. पी. एस. मदन - अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त विभाग

एस. आर. दौंड - सचिव, सामान्य प्रशासन

एम. एन. केरकेट्टा - मुख्य कार्यकारी अधिकारी, खादीग्राम

पी. वेलारासू -सचिव सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

पराग जैन- व्यवस्थापकीय संचालक, वितरण विभाग

First published: May 2, 2018, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading