Home /News /mumbai /

धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलेने दिला जुळ्यांना जन्म

धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलेने दिला जुळ्यांना जन्म

रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या आरपीएफच्या जवानांनी त्या रेल्वे डब्यात पाहिले तर एक गरोदर महिला विव्हळताना त्यांना दिसली. त्यांनी लगेच डाॅक्टरांच्या एका टीमला पाचारण केले

    मुंबई, 15 जुलै : धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका महिलेने जुळ्यां मुलांना जन्म दिलाय.  कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान विशाखापट्टम ही एक्सप्रेस गाडी कल्याण स्टेशनला येताच एका डब्यातून अचानक आरडाओरडा सुरू झाला. यावेळी रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या आरपीएफच्या जवानांनी त्या रेल्वे डब्यात पाहिले तर एक गरोदर महिला विव्हळताना त्यांना दिसली.  त्यांनी लगेच डाॅक्टरांच्या एका टीमला पाचारण केले आणि काही मिनिटातच त्या प्रवासी महिलेनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. सलमा तब्बसुम शेख असे या मातेचे नाव आहे. ती 30 वर्षांची आहे. ही एक्स्प्रेस आज सकाळी ७.५२ वाजताच्या सुमारास कल्याण स्थानकावर येताच या महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. याबाबत तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर थोड्या वेळातच या ट्रेनमध्ये महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला. उपस्थित रेल्वे पोलीस आणि प्रवाशांनी या बाळांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सेंट्रल रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने या मातेची आणि बाळाची तपासणी केली. प्रसुतीनंतर या तिघांचीही प्रकृती उत्तम आहे. हेही वाचा नुकसान सहन करून गोकुळचे संकलन उद्या बंद झारखंडमध्ये एकाच घरातील सहाजणांची आत्महत्या PHOTOS : लाॅर्डसवर धोनी-विराटसमोर गर्लफ्रेंडला केलं प्रपोझ ही घटना सर्वांसाठी सुखावणारी होती. मुलं आणि आई सुखरूप असून या सुखद घटनेला कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आरपीएफ जवानांना आवरला नाही आणि त्यांनी सेल्फी काढल्या. रेल्वेत बाळाचा जन्म अशा घटना बऱ्याचदा घडल्यात. अशा वेळी सहप्रवाशांनी मदत करून महिलेची सुटका केलीय. पण गरोदरपणी दिवस भरल्यावर असा प्रवास करणं हा एक धोका असू शकतो.
    First published:

    Tags: Birth, Kalyan, Lady, Train, Tweens, कल्याण, जुळ्यांना जन्म, ट्रेन

    पुढील बातम्या