मुंबईत विचित्र अपघात! चालकाविना Highwayवर आला ट्रेलर, तरुणाचा घेतला जीव

मुंबईत विचित्र अपघात! चालकाविना Highwayवर आला ट्रेलर, तरुणाचा घेतला जीव

बोरिवली इथं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हा अपघात झाला आहे. एक ट्रेलर हायवेवरून आडवा गेला आणि त्याखाली एक दुचाकीस्वार चिरडा गेला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

स्वाती लोखंडे, प्रतिनिधी

मुंबई, 15 नोव्हेंबर : मुंबई मेट्रोच्या कामादरम्यान भीषण अपघात झाला आहे. बोरिवली इथं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हा अपघात झाला आहे. एक ट्रेलर हायवेवरून आडवा गेला आणि त्याखाली एक दुचाकीस्वार चिरडा गेला असल्याची माहिती देण्यात आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. यासगळ्या घटनेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हायवेवर मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे अपघाती वाहनाखालून मृत व्यक्तीला बाहेर काढ्यण्याचे स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिकांच्या मते हा ट्रेलर विना ड्रायव्हर उभा होता. जो न बंद करता ड्राइवर बाहेर गेला. पण काही वेळाने ट्रक हायवेवर आला आणि अपघात झाला.

रहदारीच्या महत्त्वाच्या ठिकाणी हा अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून एकीकडे वाहतूकीला मार्ग मोकळा करण्याचं कामही सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटानस्थळावरून अपघाती वाहन बाजूला करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, झालेला प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे जमाव हटवण्याचंही काम पोलीस करत आहेत. पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी चौकशी सुरू आहे तर अपघात नेमका कसा झाला याचाही पोलीस तपास करत आहेत.

First published: November 15, 2019, 9:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading