किसान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कसं केलंय वाहतुकीचं आयोजन?

किसान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कसं केलंय वाहतुकीचं आयोजन?

रविवारी सकाळी ९पासून रात्री १०पर्यंत पूर्व द्रुतगती मार्गावरील आनंदनगर टोलनाका ते सोमय्या मैदानापर्यंत सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक बंद राहणार आहे.

  • Share this:

11 मार्च : किसान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्यासाठी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीचं नियोजन करण्यात आलंय.

- सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी

- वाहनांसाठी केवळ एक लेन उपलब्ध

- 500 अतिरिक्त वाहतूक पोलिसांची कुमक

- उद्या सायन ते दक्षिण मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस वे वर एक लेन हलक्या वाहनांसाठी

- वाहनांना केवळ 20 किलोमीटर प्रति तास जाण्याची परवानगी

- जड वाहनांनी उद्या कळवा - विटावा - ऐरोली - वाशी पुलाचा वापर करावा

रविवारी सकाळी ९पासून रात्री १०पर्यंत पूर्व द्रुतगती मार्गावरील आनंदनगर टोलनाका ते सोमय्या मैदानापर्यंत सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक बंद राहणार आहे. या वाहतूकदारांना पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईतून ठाण्यात जाण्यासाठी वाशी खाडीपूल, ऐरोली, विटावामार्गे ठाणे येथे वळवण्यात येणार आहे.

अन्य वाहतुकीसाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील एक मार्गिका खुली ठेवण्यात आली आहे. पण त्यासाठी वेगमर्यादा २० किमी इतकी ठेवावी लागणार आहे. तसेच, या मार्गावर वाहतूककोंडी होण्याचीही शक्यता वर्तवली आहे.

First published: March 11, 2018, 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading