Home /News /mumbai /

ठाणेकरांसाठी मोठी अपेडट! आज रात्री मुंबईत जाण्यायेण्यावर निर्बंध, हे आहे कारण

ठाणेकरांसाठी मोठी अपेडट! आज रात्री मुंबईत जाण्यायेण्यावर निर्बंध, हे आहे कारण

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी रात्री 7 तास ठाणे ते मुंबई दरम्यान वाहतूक बंद असणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

    ठाणे, 22 मे: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी (Thane News) आहे. शनिवारी रात्री 7 तास ठाणे ते मुंबई दरम्यान वाहतूक बंद असणार आहे.  ठाणे वाहतूक पोलिसांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. कोपरी रेल्वे ब्रीजच्या कामामुळे मार्ग बंद असणार आहे. ज्ञानसाधना ते कोपरी दरम्यान पादचारी पूल काढण्यात येणार असून त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे आवाहन पोलिसांनी दिले आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पुलावर (Kopri Railway Bridge) असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे पाडकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केले जाणार आहे. त्यामुळे आज शनिवारी शनिवारी रात्री 11 ते रविवार सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई-ठाण्यादरम्यानती वाहतूक बंद राहणार आहे. तुम्हाला जर काही अत्यावश्यक कारणास्तव प्रवास करायचा असेल तर पर्यायी मार्गाचा वापर तुम्ही करू शकता. मोठ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग नाशिक-मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद केला आहे. पर्यायी मार्गाने वाहने खारेगाव टोलनाक्यावरून गॅमन चौकमार्गे पारसिक रेती बंदर मुंब्रा बायपास येथून रबाळे, ऐरोली मार्गे मुंबईच्या दिशेने जातील. हे वाचा-लशीच्या तुटवड्यास केंद्र सरकारच जबाबदार, सीरम इन्स्टिट्यूटचा खळबळजनक आरोप तर घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांनी माजीवडा येथून वळण घेण्यास तसेच गोल्डन क्रॉस ब्रिजखाली प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी ही वाहने तत्त्वज्ञान सिग्नल पुढे माजीवडा खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन पारसिक रेती बंदरमार्गे रबाळे, ऐरोली मार्गे  मुंबईकडे जातील. लहान वाहनांसाठी पर्यायी मार्ग लहान वाहनांना नौपाडा सर्व्हिसरोड ते कोपरी ब्रिजकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी या वाहनांना साकेत येथून डावीकडे वळण घेऊन पर्यायी मार्ग म्हणुन साकेतरोड, क्रिकनाका डावीकडे वळण घेऊन शिवाजी चौक, कळवा विटावामार्गे ऐरोली येथून मुंबईच्या दिशेने जाता येईल. हे वाचा-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक प्रतिकारशक्तीच ठरतीये तरुणांसाठी घातक, वाचा कारण ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने जिल्हा मध्यवर्ती कारागृहरोड येथून विटावा, ऐरोलीमार्गे मुंबईत जातील. घोडबंदररोड आणि ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी लहान वाहने ही तीनहात नाका येथून चेक नाकामार्गे मुंबईच्या दिशेने जातील.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Thane, Traffic police, Traffic Rules

    पुढील बातम्या