OMG VIDEO : खेळणी द्या, आनंद वाटा, मुंबईतली हसतीखेळती 'टॉय बँक'

OMG VIDEO : खेळणी द्या, आनंद वाटा, मुंबईतली हसतीखेळती 'टॉय बँक'

जिथे लहान मुलं आहेत तिथे खेळणी असणारच. खेळणी ही मुलांसाठी चैन नाही तर त्यांचा मूलभूत हक्क आहे. पण या हक्कापासूनही ही मुलं वंचित राहतात. अशा मुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी श्वेता चारी यांनी 2004 मध्ये टॉय बँक सुरू केली.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : जिथे लहान मुलं आहेत तिथे खेळणी असणारच. लहान मुलांचं हे रंगीबेरंगी विश्वच असतं पण बरीच मुलं अशी आहेत की त्यांना त्यांच्या हक्काची खेळणीही मिळत नाहीत. खेळणी ही मुलांसाठी चैन नाही तर त्यांचा मूलभूत हक्क आहे. पण या हक्कापासूनही ही मुलं वंचित राहतात.

या मुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी श्वेता चारी यांनी 2004 मध्ये टॉय बँक सुरू केली. त्या म्हणतात, जिथेजिथे मुलं आहेत तिथेतिथे आम्ही खेळणी घेऊन जातो. सरकारी शाळा, छोट्याछोट्या गरीब वस्त्या, रिमांड होम अशा ठिकाणी मुलांना या खेळण्यांची जास्त गरज असते.खेळण्यांच्या आकर्षणामुळे मुलं हसतहसत जमा होतात. त्यांना खेळणी दिली की त्यात रमून जाताना त्यांचं शिक्षण कसं होईल, व्यक्तिमत्त्व विकास कसा होईल याकडे आम्ही बारीक लक्ष देतो. काही मुलं खूप मस्तीखोर असतात तर काही मुलं अगदी लाजाळू, अबोल. या दोघांचाही टोकाचा स्वभाव कमी करण्यासाठी खेळण्यांची खूप मदत होते.

खासदार पूनम महाजन आणि त्यांची मुलगी अविकाची फुल टू धमाल!

एकमेकांसोबत मिसळून खेळण्यामुळे मुलांमध्ये दयाळू भाव आणि संवेदनशीलताही वाढीला लागते. ही मस्ती की पाठशाला मुलांना हरतऱ्हेची मदत करते.श्वेता चारी म्हणतात, आम्ही मुलांसाठी हे उपक्रम राबवताना एक खबरदारी घेतली. रस्त्यावरच्या मुलांसाठी कधीच तिथे खेळणी नेऊन दिली नाहीत. खेळण्याच्या निमित्ताने मुलांनी शाळेमध्ये किंवा प्ले सेंटरमध्ये यावं म्हणून ही युक्ती केली आणि याचा चांगला परिणाम झाला.

FaceApp वापरणाऱ्यांनो सावधान! तुमची प्रायव्हसी धोक्यात

मुंबईतल्या ज्या शाळांमध्ये ही टॉय बँक आहे तिथे मुलांचं प्रवेशाचं प्रमाण वाढलं आहे. शाळेची घंटी वाजल्यावाजल्या मुलं शाळेत येतात, असं तिथले शिक्षक सांगतात. टॉय बँक या संस्थेच्या सध्या 285 खेळण्यांच्या प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून ही संस्था आतापर्यंत 43 हजार मुलांपर्यंत पोहोचली आहे. या टॉय बँकचा समावेश अभ्यासक्रमात व्हावा यासाठी श्वेता चारी प्रयत्न करतायत.

मुलांना त्यांचा खेळण्याचा मूलभूत हक्क मिळावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं हाच त्यांचा ध्यास आहे.

==================================================================================================

मला खल्लास केलं तुझ्या नादाने, आजीबाईंचा VIDEO तुफान व्हायरल

First published: July 17, 2019, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading