मिरा रोड, 11 जुलै : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. अशा या परिस्थितीत काही भामटे हे काळाबाजार करत असल्याचं समोर आले. न्यूज 18 लोकमतने या प्रकाराबाबत वृत्त प्रसारीत केल्यानंतर आता टॉसिलिझिम 400 एमजी इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत मिरा रोड येथून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
राज्य सरकारने आदेश देवून 24 तासही उलटले नाही तोच पोलीस दलाने आपले कौशल्य दाखवत टॉसिलिझिम 400 एमजी इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोन जणांवर धडक कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली.
भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू, Ducati चा चक्काचूर!
मिरा रोड येथे दोन व्यक्ती रेमेडीसेव्हर आणि टॉसिलिझिम हे इंजेक्शन घेवून येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली असता पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागाने सापळा लावून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे Covifor, Remdesivirinjection,100mg/20ml च्या 4 बॉटल सापडून आल्या. ज्यांची किंमत 21 हजार 600 रुपये नियमानुसार होती. तेच इंजेक्शन हे दोन व्यक्ती चढ्या भावाने विना परवाना विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अशी झाली कारवाई
मिरा रोड येथील साईबाबा नगर येथे कोरोनाच्या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती डॉ. बिनू वर्गीस यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड अप्पर पोलीस अधीक्षक संजय कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपी सोनी दर्शी, रोड्रिक्स टोनीराळ यांना अटक केली आहे.
लॉकडाऊनचा ट्रेण्ड कधीपर्यंत संपेल? तज्ञांसोबतच्या चर्चेनंतर शरद पवारांचा अंदाज
शुक्रवारी 4 वाजेच्या सुमारास एकना मेडीकलच्या दुकानदाराच्या ताब्यातून hetro company, Remdesivir injection, covifor असे एकूण 04 vial घेतलेले आहेत. एका इंजेक्शनची मूळ किंमत 5400 रुपये आहे. परंतु, त्यांनी या इंजेक्शनच्या 5400 या मूळ किंमतीच्या तिप्पट म्हणजे 21000 रुपयांना विकणार होते. मात्र, पोलीस आणि डॉ बिनू वर्गीस यांच्या सतर्कतेमुळे 2 आरोपींना रंगेहात पकडले असून यात एका नामांकीत रुग्णालयाचा समावेश आहे.