पर्यटनमंत्री जयकुमार रावलांचा अट्टाहास, फिल्म फेस्टिव्हलसाठी गेले जर्मनीला !

पर्यटनमंत्री जयकुमार रावलांचा अट्टाहास, फिल्म फेस्टिव्हलसाठी गेले जर्मनीला !

"अर्थ खात्याने यासाठी निधी मंजुरीला नकार दिला होता. पण पर्यटन मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला आणि निधी मंजूर करून घेतला"

  • Share this:

18 जुलै : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे विकासकामांना कात्री लागलेली असतानाही राज्याच्या पर्यटन मंत्र्यांना याचे काही घेणे-देणे नाही, मंत्री महोदय मर्जीतल्या 3 अधिकाऱ्यांना घेऊन जर्मनीच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. विभागाच्या संबंध नसलेल्या चित्रपट महोत्सवासाठी आणि ते ही भरमसाठ सरकारी खर्चाने..यातली गंभीर बाब ही की या दौऱ्याच्या व्यवस्थेसाठी खाजगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे..

राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल 19 जुलैपासून 3 दिवस जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. जर्मनी येथे आयोजित चित्रपट महोत्सवात हजेरी आणि रोड शो असा कार्यक्रम आहे. सरकारी खर्चावर चित्रपट महोत्सवाला हजेरी लावण्याची गरज काय तसेच पर्यटन आणि चित्रपट महोत्सवाचा संबंध काय..? असा प्रश्न राज्याच्या अर्थ विभागाला पडला होता, मात्र मंत्र्यांनी वजन खर्चून मुख्यमंत्र्यांकडून परवानगी मिळवली. गंभीर बाब म्हणजे दौऱ्याचे सर्व नियोजन आणि व्यवस्थेसाठी खाजगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली.

MTDC च्या यादीवर सदर allika पर्पल नावाची एजन्सी नाही तसंच ती महागडी असल्याचं महामंडळाने मंत्री कार्यालयाच्या निदर्शनाला आणूनही या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आणि या दौऱ्यासाठी तब्बल 1 कोटी 85 लाख रुपये तसंच इतर खर्च मिळून जवळपास 2 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत.

पर्यटक मंत्र्यांचा परदेश दौरा स्वाभाविक मानला तरी राज्य आणि देशाच्या पर्यटन विभागाची तसंच जोडीला परराष्ट्र विभागाची अजस्त्र यंत्रणा असतानाही खाजगी एजन्सीची नेमणूक आणि त्यावर खर्च हा वादाचा मुद्दा निश्चितच आहे.

 

First published: July 18, 2017, 9:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading