मुंबई, 29 मार्च : देशभरात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या आज 193 वर पोहोचली आहे. पुण्यात 1, मुंबईत, 4 सांगलीमध्ये 1 तर नागपुरात 1 असे नवीन 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 28 नवे कोरोनाचे रुग्ण आढऴले होते. शनिवारी 186 वर हा आकडा पोहोचला होता. तर मुंबईमध्ये 108 रुग्णांची शनिवारी नोंद करण्यात आली होती. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या या आकड्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संपूर्ण देशात कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाऊनदे आदेश असतानाही अनेक जण ते गांभीर्यानं घेत नसल्याचं चित्रही पाहायला मिळत आहे. कोरोनाचे वाढत्या आकड्यांमुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाणार का अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
Maharashtra: 7 more #COVID19 cases reported in the state(4 from Mumbai, 2 from Pune and 1 each from Sangli and Nagpur). Total number of cases in the state rises to 193
देशभरात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारवर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अहमदाबाद इथे 45 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुजरातमधील कोरोनाग्रस्ताचा हा पाचवा मृत्यू आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा महाराष्ट्रील वाढता धोका लक्षात घेता सरकार आणि पोलिसांकडून घरी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.