पार्थ पवारांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत... 5 मोठ्या बातम्या

पार्थ पवारांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत... 5 मोठ्या बातम्या

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राज्यपालांची भेट घेणार आहेत.

  • Share this:

पार्थ पवार राज्यपालांची भेट घेणार

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. विद्यार्थ्यांसंबंधित विविध प्रश्नांवरून पार्थ पवार राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती आहे.

मराठा आरक्षण : उच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यभरातील मराठा बांधवांचं लक्ष लागलेलं असेल.

आदित्य ठाकरेंचा पालघर दौरा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पालघर जिल्ह्यातील भूंकपग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. पालघरमध्ये भूकंपाने जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. आदित्य ठाकरे याबाबत आढावा घेणार आहेत.

राहुल गांधींचं भाषण

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मायनॉरिटी सेलच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील नेहरू स्टेडिअम येथे राहुल भाषण करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होईल.

रॉबर्ट वाड्रांची पुन्हा चौकशी

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. काल झालेल्या चौकशीबाबत ईडी समाधानी नसल्याची माहिती आहे. त्यामुळे वाड्रा यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येत आहे. सकाळी 10.30 वाजता ईडीकडून ही चौकशी करण्यात येईल.

First published: February 7, 2019, 6:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading