21 एप्रिल : मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेवर उद्या सकाळी 11 ते दु. 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वेवर कल्याणहून निघणाऱ्या सर्व धीम्या लोकल स. 10.37 ते दु. 4 पर्यंत मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ब्लॉक दरम्यान सीएसएमटीच्या दिशेने ये - जा करणाऱ्या लोकल स. 11 ते सायं. 6 पर्यंत किमान 10 मिनिटे उशिराने धावतील. लोकलप्रमाणेच मेल/एक्स्प्रेस गाड्यादेखील किमान 15 मिनिटे उशिराने धावतील.
तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
हार्बर रेल्वे
- कुर्ला ते वाशीपर्यंत दोन्ही मार्गांवर ब्लॉक
- स. 11.10 ते संध्या. 4.10 पर्यंत ब्लॉक
- सीएसएमटीहून पनवेल-बेलापूर-वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल स. 10.34 ते दु. 3.39 दरम्यान बंद
- पनवेल-बेलापूर-वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने सुटणाऱ्या लोकल स. 10.21 ते दु. 3.41 पर्यंत खंडीत
- सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलपर्यंत विशेष फेऱ्या
पश्चिम रेल्वे
- बोरिवली ते गोरेगावपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवर ब्लॉक
- स. 10.35 ते दु. 3.35 पर्यंत अभियांत्रिकी काम
- बोरिवलीतील 1,2,3,4 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून लोकल धावणार नाहीत.
- काही फेऱ्या रद्द
मध्य रेल्वे
- मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर ब्लॉक
- स. 10.37 ते दु. 4.02 पर्यंत ब्लॉक
- मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकांवर लोकल थांबणार नाही
- मेल आणि एक्स्प्रेस गाड्या किमान 15 मिनिटे उशिराने