Home /News /mumbai /

70 हजारांचे टोमॅटो गेले चोरीला

70 हजारांचे टोमॅटो गेले चोरीला

मुंबईच्या दहिसर एरियातून ७० हजारांचे टोमॅटो चोरीला गेले. शांतिलाल श्रीवास्तव यांच्या दुकानाबाहेर टोमॅटोचे क्रेट ठेवले होते. रात्रीत ते चोरीला गेले.

22 जुलै : पैसे, मोबाईल, सोनं चोरीला गेलेलं आपण ऐकतो. पण टोमॅटो चोरीला गेलेलं ऐकलंय? २० तारखेला मुंबईच्या दहिसर एरियातून ७० हजारांचे टोमॅटो चोरीला गेले. शांतिलाल श्रीवास्तव यांच्या दुकानाबाहेर टोमॅटोचे क्रेट ठेवले होते. रात्रीत ते चोरीला गेले. श्रीवास्तव हे नेहमी दुकानाच्या आत टोमॅटो ठेवतात. पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानात उंदीर झाले. त्यांनी विचार केला दुकानात टोमॅटो ठेवले तर रात्रीत उंदीर त्याची नासधूस करतील. म्हणून दुकानाबाहेर क्रेट ठेवून ते घरी गेले. सकाळी येऊन बघतात तर टोमॅटो गायब होते. पोलिसांचा तपास सुरूय. या मार्केटमध्ये सीसीटीव्ही नाहीयेत आणि त्यामुळे तपासात अडचण येतेय.
First published:

Tags: Theft, Tomato, चोरी

पुढील बातम्या