ठाणे, 16 जुलै: ठाण्यातील (Thane) मुंबई नाशिक महामार्गावर टोमॅटो (Tomatoes) घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात (Truck accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे ट्रकमधील तब्बल 20 टन टोमॅटो रस्त्यावर पडले होते. त्यामुळ दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. या दुर्घटनेच ट्रक चालक गंभीर जखमी (Driver injured) झाला असून त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्बल चार ते पाच तासांनी मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहितीसमोर आली आहे. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा ट्रक रस्त्याच्या बरोबर मध्यभागी उलटल्यानं रस्त्यावर वीस टन टोमॅटोचा खच पडला होता. यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक तब्बल चार ते पाच तास बंद पडली होती. यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
#WATCH | Thane, Maharashtra: Around 20 tonnes of tomatoes, scattered on Eastern Express Highway, being removed amid a huge traffic jam on both lanes of the Highway
One person was injured after a tomato-laden truck overturned near Kopari, Thane on the Highway at around 2 am today pic.twitter.com/GPOmfgd1nO — ANI (@ANI) July 16, 2021
हेही वाचा-BMC चा मोठा निर्णय, तूर्तास ऑनलाईन विवाह नोंदणी बंद
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत, वाहतूकसेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक आणि टोमॅटो बाजूला करण्यात आले आहे. सकाळी आठच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. हा ट्रक के. व्ही गिरीश यांच्या मालकीचा ट्रक आहे. शुक्रवारी रात्री चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं दुभाजकाला जाऊन धडकून हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे.
हेही वाचा-BREAKING: डोंबिवली स्टेशन जवळील इमारतीला भीषण आग
अपघातात टोमॅटोचं प्रचंड नुकसान झालं आहे. जेसीबीच्या साह्यानं टोमॅटे रस्त्याच्या बाजूला केल्यानं टोमॅटोची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. या मोठा आर्थिक फटका संबंधित शेतकऱ्याला बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Road accident, Thane, Truck accident