आधी केळीचोरी नंतर टोमॅटो लंपास, अखेर चोर गजाआड

आधी केळीचोरी नंतर टोमॅटो लंपास, अखेर चोर गजाआड

पहाटेच्या सुमारास त्यातील ५७ हजार रुपयांचे टोमॅटो चोरीला गेले होते.

  • Share this:

17 आॅगस्ट : दहिसरच्या भाजी मार्केटमधून 30 कॅ्रेट टोमॅटो लंपास करणारा चोर अखेर सापडला. चंद्रशेखर गुप्ता असं त्या टोमॅटो चोराचे नाव असून त्याला यापूर्वी केळीचोरीच्या गुन्ह्यात चेंबूर पोलिसांनी अटक केली होती.

जगत श्रीवास्तव या भाजीविक्रेत्याचा दहिसरच्या अविनाश कंपाऊंडमधील मार्केटमध्ये गाळा आहे. टोमॅटोने शंभरी गाठल्यामुळे १५ जुलैच्या रात्री श्रीवास्तव यांनी हजारो रुपयांचे टोमॅटो विकत आणून गाळ्यामध्ये ठेवले होते. मात्र पहाटेच्या सुमारास त्यातील ५७ हजार रुपयांचे टोमॅटो चोरीला गेले होते.

याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासदरम्यान मार्केट परिसरात श्री समर्थ कृपा ट्रान्सपोर्ट असे लिहिलेला एक टेम्पो दिसला. हा टेम्पो गुप्ता हा वापरत असल्याचे कळलं. त्यानुसार पोलिसांनी कुर्ल्यात सापळा रचून श्रीवास्तव यांचे टोमॅटो चोरणाऱ्या चंद्रशेखर गुप्ताला अटक करण्यात आली.

चंद्रशेखरनं २०१५ मध्ये चेंबूर परिसरात गुड्डू या त्याच्या सहकाऱ्यासह ५० कॅ्रेट केळी चोरली होती. त्या प्रकरणात चंद्रशेखर याला अटक झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 11:37 PM IST

ताज्या बातम्या