गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

गणेशोत्सवासाठी  कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

'यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली होती. मात्र रस्ते सुस्थितीत करण्यात येत आहेत.'

  • Share this:

मुंबई 26 ऑगस्ट :  गणेशोत्सवासाठी मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिलीय. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राज्यमंत्री दिपक केसरकर, यांच्यासह  संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, "यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली होती. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ काम सुरू असून, ते तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई -कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे."

आरोप करणारे स्वत:चेच कपडे फाडून घेतील; पुन्हा पेटला काका पुतण्याचा वाद

पावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलदगतीने सुरु असून, जिथे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तिथे आवश्यक़तेनुसार, रोड स्ट्रीप्स, सुचना करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्याची माहितीही चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

पुण्यात गणेशोत्सव काळात सावधानतेचा इशारा

पिंपरी-चिंचवड शहरात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या धार्मिक उत्सवावर दहशतवादाचे सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरिया/ खताचा वापर करून स्फोट घडवून आणण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पहिल्यांदाच पिंपरी शहरातील खत विक्रेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळाली आहे.

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' शब्द

युरिया/ खताचा वापर करून स्फोट घडवून आणण्याची शक्यता नाकारत येत नसल्याने शहरातील सर्व खत विक्रेते आणि आणि खतांचा साठा करणाऱ्या गोडाऊन मालकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील काळात येऊ घातलेल्या गणेशोत्सव त्याचबरोबर नवरात्रोत्सवादरम्यान स्फोट घडवून मोठा घातपात करण्याची शक्यता आहे. खत विक्रेत्यांनी प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवण्याची सक्त ताकीद देण्यात आली. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर या आदेशच उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचेही या नोटिशीत म्हटले आहे. पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रतिबंधात्मक आदेश पुढील दोन महिन्यासाठी लागू राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 07:20 PM IST

ताज्या बातम्या