S M L

मुंबईत आज भर उन्हात हरवणार सावली!

दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झालेली असल्याचा अनुभवता घेता येणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 16, 2018 11:07 AM IST

मुंबईत आज भर उन्हात हरवणार सावली!

मुंबई, 16 मे : माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसले तरी सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते. मात्र आज मुंबईकरांची ही सावली आपली साथ सोडणार आहे. आपली स्वत:ची सावली अदृश्य झाल्याचा अनुभव आज दुपारी घेता येणार आहे.

दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर काही मिनिटांसाठी आपली सावली अदृश्य झालेली असल्याचा अनुभवता घेता येणार आहे.

या आधीही सिंधुदुर्ग, कणकवली, देवगड, राजापूर आणि मीरज सांगलीत दुपारी सावली अदृश्य झाली होती.

कधी कुठे सोडणार सावली साथ?

16 मे - मुंबई, नगर, परभणी, नांदेड

17 मे - ठाणे, डोंबिवली, कल्याण

19 मे - औरंगाबाद, बीड, जालना, चंद्रपूर

20 मे - नाशिक, वाशीम गडचिरोली

21 मे - बुलडाणा, यवतमाळ,

22 मे - वर्धा

23 मे - धुळे

24 मे - भुसावळ, जळगाव

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close