शिवसेनेचा 51वा वर्धापन दिन, षण्मुखानंदमध्ये होणार सोहळा

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2017 01:25 PM IST

शिवसेनेचा 51वा वर्धापन दिन, षण्मुखानंदमध्ये होणार सोहळा

19 जून : शिवसेनेचा आज 51वा वर्धापन दिन आहे.यानिमित्ताने आज संध्याकाळी 6 वाजता माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांचा सोहळा होणार आहे.यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

या सोहळ्याला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते, उपनेते, मंत्री, खासदार, आमदार, महापौर यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.तसंच अभिनेते प्रशांत दामले यांचं साखर खाल्लेला माणूस हे नाटकही यावेळी दाखवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 12:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...