S M L

राज ठाकरेंची आज मुलुंडमध्ये जाहीर सभा

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १ मेपासून महाराष्ट्रव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. पालघर येथे त्यांची पहिली सभा होणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 15, 2018 10:48 AM IST

राज ठाकरेंची आज मुलुंडमध्ये जाहीर सभा

मुंबई, 15 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज संध्याकाळी मुलुंडमध्ये जाहीर सभा आहे. कठुआ आणि उन्नावमध्ये झालेल्या घटनांवर बोलण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १ मेपासून महाराष्ट्रव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. पालघर येथे त्यांची पहिली सभा होणार आहे.

काही दिवसांपूर्वी मनसेच्या नेत्यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं राज ठाकरे यांना कळवलं होतं. पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं राज यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचीच तयारी राज या दौऱ्याद्वारे करणार आहेत.

गेल्या वर्षापासून राज यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहेत. या दौऱ्यात ते ही टीकेची धार तीव्र करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 10:48 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close