राज ठाकरेंची आज ठाण्यात सभा, काय बोलणार याची उत्सुकता

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज ठाण्यात जाहीर सभा आहे. फेरीवाल्यांचा मुद्दा सध्या तापलेला आहे, त्यातच मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव हायकोर्टात गेलेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 18, 2017 12:56 PM IST

राज ठाकरेंची आज ठाण्यात सभा, काय बोलणार याची उत्सुकता

18 नोव्हेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज ठाण्यात जाहीर सभा आहे. फेरीवाल्यांचा मुद्दा सध्या तापलेला आहे, त्यातच मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव हायकोर्टात गेलेत. एक कोटीचा जामीन कोणत्या आधारावर मागताय, असा सवाल त्यांनी थेट ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना केलाय.यावर राज काय बोलतात, ते पहावं लागेल.

ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ही सभा होणार आहे. सभेला आधी परवानगी मिळत नव्हती, पण अखेर ती मिळाली. राजकीय परिस्थितीवरही राज ठाकरे काय बोलतात, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रस्तावित स्मारकावर ते भाष्य करतात का, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2017 12:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...