S M L

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचा परंपराही मोडीत काढत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे भूमिका मांडली.

Sonali Deshpande | Updated On: Jul 24, 2017 03:14 PM IST

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू

24 जुलै : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहे.पण दुसरीकडे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव आधी करायचा की माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा, या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगले आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचा परंपराही मोडीत काढत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे भूमिका मांडली.

तर शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका कायम गोंधळाची असून 34 हजार कोटींच्या कर्जमाफीचा आकडा सरकारनं आणला कुठून असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलाय. तर या सरकारची आश्वासनं आणि घोषणा गोल गोल आहेत. अशा सोनू सरकारवर भरोसा राहिला नसल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय. सत्तेत आल्यापासून शिवसेनेची भूमिका कायम संशयास्पद राहिलीये. त्यामुळे शिवसेनेच्या मेंदूत झोल झोल झालाय असं सांगत शिवसेना म्हणजे एफएम रेडिओ झाल्याची टीकाही त्यांनी केलीये.

तसंच राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी, तूर खरेदीचा प्रश्न, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील घोटाळे, कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे अधिवेशनात सरकारचा कस लागणार आहे. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 10:02 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close