रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

  • Share this:

21 मे : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर आज, रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन फास्टवर स. १०.३० ते दु. ३.३० पर्यंत ब्लॉक चालणार आहे.

सीएसएमटीहून सकाळी 9.38 ते दुपारी 2.54 या कालावधीत डाऊन फास्ट आणि सेमी फास्ट लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांवर थांबतील. डाऊन फास्ट लोकल ठाण्यापुढे कल्याणपर्यंत डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येईल. तर ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास्ट आणि सेमी फास्ट लोकल सकाळी 10.46 ते दुपारी 3.18 वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्लाला थांबतील.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीपर्यंत अप आणि डाऊन हार्बरवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वेळेत ब्लॉक चालेल. सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी लोकल सेवा सकाळी 10.35 ते दुपारी 3.37 वेळेत बंद राहतील. त्याचप्रमाणे पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी सेवा  सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 वेळेत बंद असेल. या काळात काही विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि नायगावमध्ये अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक चालणार आहे.

First published: May 21, 2017, 8:47 AM IST

ताज्या बातम्या