आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल, तसेच हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान, कुर्ला-वाशी लोकलसेवा पूर्णपणे बंद राहील.

  • Share this:

15 एप्रिल : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा आजचा रविवारही मेगा ब्लॉकमध्ये जाणार आहे. सिग्नल यंत्रणेच्या कामांसाठी आज एप्रिल रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल, तसेच हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान, कुर्ला-वाशी लोकलसेवा पूर्णपणे बंद राहील.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने, रविवारी दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

First published: April 15, 2018, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading