आज कर्जमाफीसंदर्भात भाजपची बैठक,शिवसेनेला आमंत्रण नाही

आज कर्जमाफीसंदर्भात भाजपची बैठक,शिवसेनेला आमंत्रण नाही

कालच्या शेतकरी संपात शिवसेनेनं राजकीय घुसखोरी केल्यानं मुख्यमंत्री चांगलेच संतापलेत.

  • Share this:

06 जून : उद्याच्या कॅबिनेटपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी सर्व भाजप मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावलीय. या बैठकीत कर्जमाफीसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.शिवसेना मंत्र्यांना मात्र, या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही.या बैठकीत शिवसेनेशी चर्चा न करता मोठा निर्णय झाला तर त्याचे पडसाद उमटू शकतात, असं जाणकारांचं मत आहे.

कालच्या शेतकरी संपात शिवसेनेनं राजकीय घुसखोरी केल्यानं मुख्यमंत्री चांगलेच संतापलेत.एवढंच नाहीतर आंदोलनातल्या राजकीय घुसखोरांवर कठोर कारवाईचे संकेतही सरकारनं दिलेत. त्यामुळे शेतकरी संपातल्या राजकीय घुसखोरीवरून शिवसेना आणि भाजप पुन्हा आमने सामने आलेत.

First Published: Jun 6, 2017 01:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading