शेतकऱ्यांच्या हातात अजूनही 10 हजाराची उचल नाहीच

शेतकऱ्यांच्या हातात अजूनही 10 हजाराची उचल नाहीच

निवडक शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी चंद्रकांत पाटील दुपारी तीन वाजता चर्चा करतील. त्यानंतरच कर्जमाफीचे निकष ठरणार आहेत.

  • Share this:

19 जून : कर्जमाफीसंदर्भात सरकारच्या फक्त मॅरेथॉन बैठका सुरुच शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाबाबतची कर्जमाफी निकष निर्धारण समितीच्या आज मुंबईत दोन बैठका होताहेत.सरकारसोबत बैठक करण्याअगोदर 35 शेतकरी संघटनांची माहिममध्ये बैठक होतेय. त्यानंतरच निवडक शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी चंद्रकांत पाटील दुपारी तीन वाजता चर्चा करतील. त्यानंतरच कर्जमाफीचे निकष ठरणार आहेत.

दरम्यान या संदर्भात बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना अजून 10 हजाराचीही उचल मिळाली नाहीय. कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या अटी जटील असल्याचं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आज बैठकीत ठरणाऱ्या कर्जमाफीच्या निकषाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सध्या सुकाणू समितीची बैठक सुरू झालीय. जयंत पाटील, बच्चू कडू, रघुनाथ पाटील, नवले या बैठकीत उपस्थित आहेत.

First published: June 19, 2017, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading