आज बीएमसीचा अर्थसंकल्प; मुंबई'कर' चिंतेत!

आज मुंबईकरांच्या कराचा बोजा वाढणार की घटणार याकडे सगळ्या मुंबईकरांच लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेचं वर्ष २०१८-१९चा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 2, 2018 08:47 AM IST

आज बीएमसीचा अर्थसंकल्प; मुंबई'कर' चिंतेत!

02 फेब्रुवारी : आज मुंबईकरांच्या कराचा बोजा वाढणार की घटणार याकडे सगळ्या मुंबईकरांच लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेचं वर्ष २०१८-१९चा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिका देशातली सर्वात श्रीमंत महापालिका असल्यानं या पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागून असतं. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाक मुंबई महानगरपालिकेचा 25,141 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यात आधुनिक कारभारावर भर देण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलं होतं. यावर्षी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा होतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

गेल्यावर्षी अर्थसंकल्पात सुमारे १२००० कोटी रुपयांची घट करुन बीएमसी आयुक्त अजॉय मेहता यांनी सगळ्यांनाच एक मोठा धक्का दिला होता. मात्र ही घट नसून वाढीव फुगवटा कमी केला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर पारदर्शक कारभार, जबाबदारी, काटकसर, विकास आराखड्याशी संलग्नता, आर्थिक स्त्रोतांचा सुयोग्य वापर या पाच मुख्य मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे गेल्यावर्षाचं अर्थसंकल्प सादर करण्यात आलं होतं.

यावर्षी मात्र असा कुठलाही मोठा धक्का अर्थसंकल्प देणार नाही. अशी माहिती सुत्रांकडून सांगण्यात आली आहे. शिवाय मोठी अशी कुठलीही नवी घोषणा किंवा नव्या प्रकल्पाची सुरूवात करण्याचे संकेत सुद्धा मिळणार नाही असं सांगितलं जातंय.

पण मुख्य म्हणजे जीएस्टी लागू झाल्यानंतर मागील वर्ष हे पहिल वर्ष होतं. त्याचे काय परिणाम बीएमसीच्या अर्थकारणावर झाले हे आजच्या अर्थसंकल्पातून बाहेर पडेल. नेमक्या कोणकोणत्या गोष्टींवर कर आकारला जाईला. याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. वर्षभराचं आर्थिक उत्पन्न आणि खर्च या मुद्द्यांवर आजचं अर्थसंकल्प सादर केलं जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 08:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...