समीर भुजबळांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष

समीर भुजबळांच्या जामीन अर्जाच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणाराय.

  • Share this:

मुंबई, 09 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणाराय. छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच समीर यांनाही जामीन मिळणार का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

छगन भुजबळ यांना गेल्याच आठवड्यात जामीन मिळालाय. सध्या त्यांच्यावर मुंबईतल्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच समीर यांनीही ईडीच्या कायद्यातील कलम ४५च्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं आहे. त्यामुळे कोर्ट छगन भुजबळ यांच्याप्रमाणे समिर यांना जामीन देतं का हे पाहावं लागेल.

समीर भुजबळ मनी लॉड्रिंग प्रकरण

फेब्रुवारी २०१६ - मनी लॉड्रिंग प्रकरणात समीर भुजबळला ईडीकडून अटक

- खोट्या कंपन्या स्थापन करून महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील लाचखोरीचे पैसे फिरवले

- महाराष्ट्र सदन बांधकामात ७८५ कोटींचा घोटाळा झाल्याचा 'ईडी'चा दावा

- यापूर्वी हायकोर्ट आणि ईडी कोर्टाने अनेकदा जामीन अर्ज फेटाळला

- नोव्हेंबर २०१७ - पीएमएलए कायद्यातील कलम ४५ सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवलं

- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन समीर भुजबळची जामिनासाठी पुन्हा कोर्टात धाव

- पण, साक्षीदारांवर दबाव टाकण्याच्या शक्यतेमुळे ईडीने पुन्हा जामीन नाकारला

- ४ मे २०१८- हायकोर्टाकडून छगन भुजबळांना याच गुन्ह्यात जामीन मंजूर

- छगन भुजबळांना जामीन मिळाल्याने समीर भुजबळांचीही जामिनासाठी हायकोर्टात धाव

First published: May 9, 2018, 12:50 PM IST

ताज्या बातम्या