Home /News /mumbai /

'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा न देणारे आज हिंदीत भाषणं करत होते', शिवसेनेचा पलटवार

'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा न देणारे आज हिंदीत भाषणं करत होते', शिवसेनेचा पलटवार


आजची सभा उत्तर भारतीयांना लुभावणारी होती. मुंबईत राहून हिंदीत भाषणं करतात.

आजची सभा उत्तर भारतीयांना लुभावणारी होती. मुंबईत राहून हिंदीत भाषणं करतात.

आजची सभा उत्तर भारतीयांना लुभावणारी होती. मुंबईत राहून हिंदीत भाषणं करतात.

    मुंबई, १५ मे - 'आजची सभा उत्तर भारतीयांना लुभावणारी आहे. मुंबईत राहून हिंदीत भाषणं करतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ न शकणारे आज हिंदीत बोलत आहे' असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना उत्तर दिले आहे. भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने हिंदी भाषिक संकल्प संमेलनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. 'उद्धव ठाकरे कधीच लाफ्टर शो करत नाही. कारण आधीच लाफ्टर शो झाले आहे, भोंगे वाजून झाले आहे. हनुमान चालीसा पठण करून झाली आहे. उधवजी कधीच लाफ्टर शो कधीच करत नाही. उद्धव ठाकरे यांची लाफ्टर सभा म्हणे हे कुणी मान्य करणार नाही'असं म्हणत पेडणेकर यांनी राज ठाकरे आणि राणा दाम्पत्यांना टोला लगावला. (watermelon rate : कलिंगडाचे दर गडगडले; ग्राहकांची रांग, शेतकरी मात्र बेहाल!) आजची सभा उत्तर भारतीयांना लुभावणारी होती. मुंबईत राहून हिंदीत भाषणं करतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ न शकणारे आज हिंदीत बोलत आहे. अख्य़ा भाषणंही हिंदीत झाली. केंद्रात सरकार असून मराठी भाषेला अभाजित भाषेचा दर्जा देऊ शकले नाही, ते आमच्यावर टीका करत आहे. जे कायम मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करत आले आहे.गेले २५ वर्ष आमच्यासोबत बसले होते आता त्यांची उत्तरपूजा नक्कीच करणार आहे, आता लवकरच उत्तर पूजा सभा होणार आहे, असंही पेडणेकर यांनी सांगितलं. ('ओठांचं चुंबन, प्रेमाने स्पर्श हा अनैसर्गिक गुन्हा नाही,' कोर्टाचं मोठं विधान) 'चार वर्षे बाजूला बसले सामान्य मुंबईकरांचे पैसे लुटणारे लोढा आज भाषण देत आहे. मुंबईला केंद्रशासित करण्याचे स्वप्न पाहत आहात ते कधीच पूर्ण होणार नाही. लोढा यांनी लोकांनी पैसे खाऊन मोठे झाले आहे. त्यांनीच सांगितले या मुंबई वर भगवा लाहर्णार नियतीने त्यांच्याकडून घोकून घेतले,असंही पेडणेकर म्हणाल्या.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या