पालिकेच्या सभागृहात शक्तिप्रदर्शनाचा दुसरा अंक?

पालिकेच्या सभागृहात शक्तिप्रदर्शनाचा दुसरा अंक?

जकातीची भरपाई म्हणून राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नियमित अनुदानाचा पहिला धनादेश घेण्यासाठी शिवसेना आणि तो देण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे.

  • Share this:

05 जुलै : आज महापालिकेच्या सभागृहात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. जकातीची भरपाई म्हणून राज्य सरकारकडून मिळणाऱ्या नियमित अनुदानाचा पहिला धनादेश घेण्यासाठी शिवसेना आणि तो देण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. महापौर निवडीवेळी झालेल्या शक्तिप्रदर्शनाचा दुसरा अंक पालिकेत रंगण्याची शक्यता आहे.

देशभरात जीएसटी लागू झाल्यामुळे १ जुलैपासून महापालिकेत दरदिवशी जमा होणारी १५ ते १७ कोटींची जकातही बंद झाली आहे. मात्र जकात बंद झाल्यामुळे मुंबईच्या विकासावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला महापालिकेच्या तिजोरीत जीएसटीमुळे होणारी नुकसानभरपाई जमा करण्याची तरतूद विधेयकात केली.

या पार्श्वभूमीवर जीएसटी नुकसानीचा पहिला धनादेश खास सोहळ्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.

First published: July 5, 2017, 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading