मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Corona Vaccination: आज पुन्हा एकदा मुंबईत फक्त महिलांचं लसीकरण, दोन्ही डोस येणार घेता

Mumbai Corona Vaccination: आज पुन्हा एकदा मुंबईत फक्त महिलांचं लसीकरण, दोन्ही डोस येणार घेता

Mumbai Corona Vaccination:  आज पुन्हा एकदा मुंबईत केवळ महिलांसाठी लसीकरणाची (vaccination) मोहिम आखली आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 09 ऑक्टोबर: आज पुन्हा एकदा मुंबईत केवळ महिलांसाठी लसीकरणाची (vaccination) मोहिम आखली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढावं यासाठी या निर्णय घेण्यात आला आहे. आज मुंबईत फक्त महिलांचं (Vaccination for women) लसीकरण होणार आहे. मुंबईतल्या विविध केंद्रांमध्ये आज सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत महिलांसाठी लसीकरण सुरु असणार आहे. या मोहिमेत महिलांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस (first and second doses) घेता येणार आहे. यावेळी या विशेष लसीकरणामुळे आज ऑनलाईन नोंदणी बंद असणार आहे. मुंबई पालिकेनं ही महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबवली आहे. हेही वाचा- IPL 2021: इशान किशन करणार राहुलचा पत्ता कट! T20 वर्ल्ड कपसाठी विराटचा खास प्लॅन  आतापर्यंत मुंबईत 85 टक्के जणांनी पहिला तर 45 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. आज महिलांसाठी होणारं हे तिसरं विशेष लसीकरण आहे. हेही वाचा-  मुलाच्या उपचारासाठी पैसे नसल्यानं वृद्ध महिलेनं निवडला विचित्र पर्याय; वर्षभरात झाली करोडपती थेट जा लसीकरण केंद्रावर मुंबईतल्या राज्य, महानगरपालिका रुग्णालयं तसंच कोरोना सेंटर येथील सर्व 328 लसीकरण केंद्रांवर थेट जाऊन ( वॉक इन) महिलांना लस घेता येईल. यात कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा असे दोन्ही घेता येणार आहेत. हे केवळ महिलांसाठी लसीकरण असल्यानं ऑनलाईन नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.
First published:

Tags: BMC, Corona vaccination, Corona vaccine, Mumbai

पुढील बातम्या